-जि.प.तील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे मंत्री मुश्रीफ यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर :
वरीष्ठ सहायक पदोन्नती टक्केवारी (पदोन्नती 75 टक्के व स्पर्धा 25 टक्के) वाढवावी. `एडीएस’मध्ये लिपिकांची टक्केवारी वाढवावी. वर्ग चारमधून लिपिक पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचाऱयांना पदोन्नती पूर्वी आ. प्र. योजनेचा पहिला लाभ देताना हवालदार ऐवजी कनिष्ठ सहायकची वेतनश्रेणी द्यावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय संघटनेच्यावतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
लिपीक वर्गीय संघटनेच्या प्रतिनिधींनी कागल येथील मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. मागण्यांचे निवेदन मंत्री मुश्रीफ यांना दिले.यामध्ये नियमितपणे स्पर्धा परीक्षा घ्याव्यात. 2008 पूर्वी आगाऊ वेतनवाढ मंजूर झालेल्या कर्मचाऱयांना वेतन वाढ व फरक द्यावा आदी मागण्यांचा समोवश आहे. यावेळी आर्थिक भार न पडणाऱया मागण्या निश्चित मार्गी लावू व मंत्रालय स्तरावर चर्चेसाठी वेळ देऊ असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांना दिले.
यावेळी शिव स्वराज्य दिन साजरा करण्यासाठी परिपत्रक काढून अंमलबजावणी केल्याबद्दल संघटनेच्यावतीने मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल अधीक्षक अमित माळगे व कनिष्ठ सहाय्यक अमर माळी यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी लिपिक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष निलेश म्हाळुंगेकर, उपाध्यक्ष भालचंद्र माने, सचिव फिरोज खान फरास, अश्विन दारवाडकर, शैलेश पाटणकर, नागेश खोत, दिनकर घुले, उदय कुलकर्णी, बाबुराव कात्रे, दत्तात्रय निकम, बजरंग बराले, साताप्पा पाटील, आनंदा बारड, आण्णा कोरवी, महादेव माने व इतर लिपिक संघटनेचे लिपिक बांधव उपस्थित होते.