कोल्हापूर / प्रतिनिधी
दत्तवाड मतदारसंघातून सहा महिन्यांपूर्वी निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माजी जि. प. सदस्य बंडा माने यांचे ते नातू होते. सहा महिन्यापूर्वी बंडा माने यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी पोटनिवडणुकीत प्रवीण माने यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यामध्ये विजय झाले होते. अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी जिल्हा परिषदेचा कारभार अवगत केला होता. मतदारसंघातील विकासकामांबाबत ते नेहमी आग्रही असायचे.