प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) अध्यक्षपदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त खात्याचे अवर सचिव प्रणव भट यांनी तसा आदेश जारी केला आहे. त्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना महामंडळाच्या संचालक मंडळावर तसेच अध्यक्षपदीही नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती तात्काळ अंमलात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.