प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या जीएसएस महाविद्यालयाच्या के. एम. गिरी सभागृहात विद्यार्थी परिषदेचा नुकताच शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप कमांडर एनसीसी बेळगावचे कर्नल के. श्रीनिवास उपस्थित होते.
विद्यार्थिनी पूर्वी हिच्या स्वागतगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्राचार्य प्रणव पित्रे यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. कीर्ती फडके यांनी करून दिला. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश कलघटगी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
केले. विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी आपल्या जबाबदाऱया आणि महाविद्यालयाच्या नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी मानस गावडे आणि महिला प्रतिनिधी ऐश्वर्या विळगीकर यांची नियुक्ती करण्यात आली.