बेंगळूर : केंद्र सरकारने कर्नाटकासह विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जीएसटीची भरपाई दिली आहे. त्यानुसार कर्नाटकाला 8,542 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी अधिक खर्च करणे शक्य होणार आहे.
जीएसटी रकमेपैकी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांना एकूण 75 हजार कोटी रु. वितरीत केले आहेत. कर्नाटकाला 8,542 कोटी रुपये, महाराष्ट्राला 6,501 कोटी रु., गुजरातला 6,101 कोटी रु. तसेच हरियाणा, केरळ, पंजाब या राज्यांनाही मोठय़ा प्रमाणात जीएसटीचा वाटा देण्यात आला आहे. 28 मे रोजी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्र सरकारने राज्यांना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता.