प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये पहिल्या व दुसऱया टप्प्यातील कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वरित्या पूर्ण झाली आहे. जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये ज्ये÷ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित भाते आणि डॉ. परितोष देसाई यांनी भारत बायोटेकची को व्हॅक्सिन व झायड्सची अशा दोन्ही लसींची मानवी चाचणी केली आहे. भारत बायोटेकच्या को व्हॅक्सिनमध्ये पहिल्या टप्प्यात 4 जणांना आणि दुसऱया टप्प्यात 50 जणांना लस देण्यात आली आहे.
दुसऱया टप्प्यात झायड्स कॅडिलाची चाचणी 175 जणांवर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणी झायड्सने आपल्याच प्रयोग शाळेत केली आहे. एकूण जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये 229 जणांना मानवी लस देण्यात आलेली आहे. यापैकी सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोणालाही लस दिल्यानंतर कसलाही त्रास जाणवलेला नाही किंवा रिऍक्शन आलेली नाही.
मानवी लस टोचण्याचे जे निकष ठरविण्यात आले आहेत त्याअंतर्गत 18 ते 65 वयोगटातील सुदृढ व्यक्तींना लस दिली जाते. भारत बायोटेकने 18 ते 55 हा वयोगट निश्चित केला तर झायड्सने 18 ते 65 हा वयोगट निश्चित केला आहे. जीवनरेखामध्ये भारत बायोटेकची को व्हॅक्सीन लस एकूण 54 जणांना तर झायडस्ची लस एकूण 55 जणांना देण्यात आली आहे. भारत बायोटेकची को व्हॅक्सीन पहिली लस दि. 31 ऑगस्ट रोजी चार जणांना देण्यात आली. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. 14 दिवसानंतर त्यांना परत दुसरी लस देण्यात आली.
बेळगावमध्ये मानवी चाचणी करुन घेण्यासाठी डॉक्टर, वकील, आरोग्य कर्मचारी, अर्थसल्लागार, डॉक्टरांचे कुटुंबिय यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद आणि त्यांच्या पत्नी यांनीही चाचणी करुन घेतली आहे. ही चाचणी करुन घेणाऱयांमध्ये मुळगुंद हे एकमेव जोडपे आहे. जीवनरेखाने केलेल्या आवाहनानंतर बेळगावमधील अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
डॉ. अमित भाते
भारत बायोटेक आणि झायडस कॅडीला या दोन्ही कंपन्यांच्या लस हॉस्पिटलमध्ये दिल्या गेल्या आहेत. यापैकी कोणालाही त्रास झालेला नाही. लस ज्यांना दिली आहे त्यांच्या शरीरामध्ये प्रतिजैवके (ऍन्डीबॉडीज) तयार झाल्या आहेत का? याची चाचणी केली जात आहे.