कोरगाव पंचायतीचे पाच पंचसदस्य व्यासपीठावर
प्रतिनिधी /पेडणे
मिशन फॉर लोकलचे सर्वेसर्वा आणि पेडणे मतदार संघातील जुने भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले राजन कोरगावकर यांच्या समर्थकांनी कोरगाव येथे राविवारी भूमिका मंदिर प्रांगणात सभेचे आयोजन करत शक्ती प्रदर्शन केले. पेडणे मतदारसंघातून राजन कोरगावकर यांनाच निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांची मागणी होती की राजन कोरगावकर यांना भाजपाची उमेदवारी द्यावी ,त्यानुसार हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, देवस्थान अध्यक्ष मंगेश स्थळी, राजन कोरगावकर, पंच उदय पालयेकर, पंच कुस्तान कुऍलो, पंच अब्दुल नाईक, पंच वसंत देसाई, पंच महादेव पालयेकर, राजू नर्से, माजी सरपंच पंढरी आरोलकर, दशरथ गावडे, रोहिदास भाटलेकर, रेशमी कोरगावकर, दाजी कासकर, मधुकर पालयेकर, कृष्णा गावडे, प्रशांत गावडे, सुदन बर्वे, प्रकाश गावडे, गोपाळ शेटय़े आदी उपस्थित होते.
बाबू आजगावाकर यांच्याकडून रोजगार मिळणे शक्मय नाहीः रंगनाथ कलशावकर
जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर बोलताना म्हणाले, रोजगार बाबू आजगावकरकडून मिळणे अशक्मय असल्याने आम्ही आता स्थानिक उमेदवार तालुक्मयातला हवा होता म्हणून आम्ही त्यांना पुढे आलो. राजन कोरगावकर यांना पुढे घेऊन जाऊया .,राजन कोरगावकर हे सुशिक्षित आहेत.पेडणेची कायापालट करूया आणि आमदार , मंत्रिपदाची खुर्ची देऊया असे आवाहन केले .हीच संधी योग्य आहे प्रत्येकाने मतदान करून राजन कोरगावकर यांच्या मागे रहा असे आवाहन केले.
बाबूने पेडणेकरांवर अत्याचार केलेः राजन कोरगावकर
मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी बोलताना आजचा दिवस हा गावातील गावकऱयांमुळे घडला .सभेला येऊन तुम्ही जो वेळ दिला त्यासाठी आपण 365 दिवस वेळ देईल . बाबू आजगावकर पंच महिला सदस्यांवर अत्याचार केला . पंचायतीच्या मंडळामुळे आपण घडलो .बाबूने अत्याचार केले हे बाबूला शोभत नाही. स्वाभिमानी नागरिक तुला तुझी जागा दाखवून देणार . मिशनचे कार्य हेच आहे अत्याचारी मांणसाविरोधात आता स्वाभिमानी पेडणेकर धडा शिकवणार असे सांगितले . आपण स्थानिक आहोत ,तुम्ही गुलामगिरीत आम्हाला ठेवले आता विचार बदला एकता हीच त्यांना धडा शिकवणार असे सांगितले .बाबू फटींगिरी करत आहे विकास फटींगिरी करून केला . पेडणेचा माणसाचा विकास केला नाही . जी खाती आहे त्यातून काहिच केले नाही. आता आणखी पाच वर्षे बाबूंना देऊ नये ,अधिकार असून काहीच केले नाही आता पाच वर्षात कसल्या नोकऱया देतील असा सवाल उपस्थित केला.
भाजपचे ज्येष्ट जुने कार्यकर्त्यांची उपस्थिती
पेडणे भाजपा मंडळ माजी अध्यक्ष दाजी कासकर ,गुंडू राऊळ ,रोहिदास भाटलेकर ,माजी सरपंच पंढरी आरोलकर ,कृष्णा गावडे , विश्वास नारोजी, सुदन बर्वे , कृष्णा गावडे आदी जुने कार्यकर्ते उपस्थिती होते .
बाबू समर्थक पाच कोरगावचे पंच सदस्य व्यासपीठावर
कोरगावचे पंच अब्दुल नाईक ,पंच कुस्तान कुऍलो,पंच उदय पालयेकर ,पंच वसंत देसाई , शिवाय जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.माजी आमदार विजय कामुलकर यांच्या पत्नी सुकांती कामुलकर यांचा सत्कार करण्यात आला .तिने मनोगत व्यक्त करताना उशिरा का होईना आमदारांची दखल घेऊन आपला सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . माजी सरपंच राजू नर्से यांनी बोलताना म्हणाले, युवा पिढीला पुढे नेण्यासाठी हे मिशन आहे .आम्ही स्वाभिमानी स्थानिक पेडणेकर आहोत म्हणून एकत्रित आलोत,कोरोना काळात लोकांना हात देण्याचे काम केले. सरपंच उमा साळगावकर व पंच प्रमिला देसाई यांना बाबूने आमच्या सोबत सभेला येणार म्हणून पोलीस स्टेशनवर नेऊन बसवले . बाबूने दोन लिटर तेल चतुर्थीला दिले ते एक लिटर तेल आता बांबूच्या पाठीला लावणार. अनपड व गवार हा बाबू आहे असा आरोप नर्से यांनी करून राजन यांनी कुणाला टोप्या घातल्या नाहीत तर खेळाडूना कॅप दिले असा सांगितले.
अन्यथा मोर्चा
दोन पंचना आज पोलिसांनी सोडले नाही तर उद्या पेडणे पोलीस स्टेशनवर मोर्चा नेणार असे राजू नर्से म्हणाले.
बाबूंना कोरगावात अडवणार
कोरगावात बाबू आले तर आता त्यांना अडवून प्रश्न विचारणार लोकांना विनाकारण का त्रास केला म्हणून त्यांना जाब विचारणार असे राजू नर्से म्हणाले.
स्थानिक उमेदवार हवाः प्रा. सुदन बर्वे
मागची 20 वर्षे आम्ही स्थानिक उमेदवार शोधत होतो ,बाहेरचे जिंकले मंत्री झाले काम केले ,मात्र आता स्थानिक हवा ,देवाची इच्छा आहे राजन कोरगावकर हाच आमदार होईल.आता लोकल उमेदवार आमच्यासमोर आहे. आता मताद्वारे परिवर्तन करूया. सभा संपण्यापूर्वी त्या दोन्ही पंचना सोडावे अन्यथा विपरीत परिणामांना सामोरे जावे लागेल.
उदय पालयेकर यांनी बोलताना लोकांची उपस्थिती पाहिल्यास हीच मंडळी कोरगावकर यांना विजयी करतील आता बाहेरची गुलामगिरी आम्ही करणार नाही असा विश्वास पंच पालयेकर यांनी व्यक्त केला.
प्रशांत शेटय़? यांनी बोलताना पोलिसांची दादागिरी खपवून कोरगावासी घेणार नाही ,मंत्री आजगावकर हे अधिकाराचा दुरुपयोग केला ,आज जर दोन्ही पंच सुटले नाही तर आम्ही सकाळी मोर्चा नेणार असा इशारा दिला.
माजी सरपंच पंढरी आरोलकर यांनी बोलताना पासून आम्ही स्थानिक उमेदवार शोधत होतो आता आमचा उमेदवार आहे. पर्रीकर यांनी सांगितले होते .2022 साली उमेदवार स्थानिक दे आणि पर्रीकर यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी आता भाजपचे उमेदवारी राजन कोरगावकर यांना देण्याची मागणी केली.
पंच वसंत देसाई यांनी बोलताना सांगितले बाबू पंचाना ओळखत नाही. आमदार बाबू आजगावकर यांना जमले नाही ते आता पेडणेकर करून दाखवणार ,अनपड आमदार नको आता सुशिक्षित आमदार हवा.
रोहिदास भाटलेकर, मंगेश थळी, दाजी कासकर,पंच अब्दुल नाईक,गोपाळ शेटय़?, मधू पालयेकर यांची भाषणे झाली. सूञसंचालन वासुदेव शेटय़ यांनी केले.तर राजू नर्से यांनी आभार मानले.