निर्यात पोहचली 32.5 अब्ज डॉलर्सवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जून महिन्यात देशाची निर्यात 48.34 टक्क्यांनी वाढून 32.5 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली असल्याची माहिती आहे. पेट्रोलियम उत्पादने आणि रत्ने व आभूषणे, रसायने, चामडी (लेदर) वस्तुंच्या निर्यातीत वृद्धी दिसून आली आहे.
दुसऱया बाजूला आयातीमध्ये 98.31 टक्क्यांनी वाढ झाली असून 41.87 अब्ज डॉलर्सचा टप्पा आयातीने गाठला आहे. यासोबतच व्यापारी तूट 9.37 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे.
एप्रिल ते जून 2021 या दरम्यान निर्यात 85.88 टक्क्यांनी वधारुन 95.39 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांच्या दरम्यान आयात वाढून 126.15 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे.
खनिज तेलाची आयात
जून 2021 मध्ये खनिज तेल आयात 10.68 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. जून 2020 मध्ये ही आयात 4.93 अब्ज डॉलर्सची होती. एप्रिल-जून 2021 च्या दरम्यान तेल आयात 31 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत 13.08 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती.