प्रतिनिधी/ सातारा
सातारा-नुकत्याच झालेल्या जेईई आणि नीट परिक्षेत विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू ऍकॅडमी ऍण्ड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. कोरोना महामारीच्या काळातही ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडूण देण्याचे काम छ. शाहू ऍकॅडमीच्या माध्यमातून सुरु असून याचा ङ्गायदा पुढील स्पर्धात्मक परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यानिमीत्ताने व्यक्त केला.
कॉलेजचा विद्यार्थी आर्य ङ्गाळके याने जेईई मेनमध्ये 99.89 टक्के गुण मिळवले आणि जेईई (ऍड.) मध्ये 247 वी रँन्क मिळवली. अभिषेक देशमुख याने जेईई मेनमध्ये 97.33 टक्के गुण आणि बीडसॅटमध्ये 322 गुण, यश उपाध्याय याने जेईईमध्ये 97.29 टक्के, सुश्रुत पवार याने जेईईमध्ये 97.73 टक्के तर रिया देवी हिने नीट परिक्षेत 720 पैकी 651 गुण मिळवून यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे वेदांतिकाराजे भोसले, प्राचार्या डिंपल जाधव आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.