ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘जॉन्सन ॲन्ड जॉन्सन’ या फार्मा कंपनीने भारतात लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर शरिरात रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे समोर आल्यानंतर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेने या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. युरोपातही या लसीचा वापर टाळण्यात येत आहे. त्यामुळे भारताकडून या लसीला मिळणारी परवानगी आता लांबणीवर पडली आहे.
अमेरिकेत 68 लाख लोकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. त्यामधील 6 लोकांच्या शरीरात रक्ताच्या गुठळय़ा झाल्याचे समोर आले. त्यामधील एकाचा मृत्यूही झाला. त्यामुळे रक्तातील या गुठळ्यांची तपासणी होईपर्यंत या लसीचा वापर थांबविण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.