ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. बॉलीवूडमध्ये देखील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. या जाळ्यात आता अनेक कलाकार अडकले आहेत. त्यातच आता ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, दुर्दैवाने, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील 10 दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपा करून कोरोनाची चाचणी करा, अशी विनंती देखील परेश रावल यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, यापूर्वी आमिर खान, आर माधवन, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, वरुण धवन आदी कलाकारांना कोरोनाची बाधा झाली होती. यातील काही जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.