दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्ये÷ नेते आणि दिल्ली विधानसभेचे माजी आमदार महाबळ मिश्रा यांना काँग्रेसने पक्षातून पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबित केले आहे. दिल्लीत 8 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला मतगणना होणार आहे. मिश्रा यांनी गेले काही दिवस पक्षाच्या आदेशाविरोधात कार्य केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाच्या दिल्ली शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी मिश्रा यांचे पुत्र विनयकुमार यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. विनयकुमार यांनी मागची विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, ते अपयशी ठरले होते. आपमध्ये प्रवेश करताक्षणीच त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे महाबळ मिश्रा यांच्या पक्षनि÷sबद्दल संशय निर्माण झाला असून त्यांना कारवाईला तोंड द्यावे लागत आहे, असे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात
आले आहे.