रांची / वृत्तसंस्था
झारखंडच्या सिंहभूम जिह्यात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. रविवारी दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी सिंहभूम परिसर भूकंपाच्या धक्क्मयांमुळे हादरला. या दुर्घटनेत रात्री उशिरापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली नाही. तथापि, भरदुपारी झालेल्या या धक्क्यांमुळे बरेच लोक भयभीत होऊन घराबाहेर पडल्याचे दिसून येत होते. यापूर्वी गेल्या आठवडय़ात अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये दोनवेळा भूकंपाची नोंद झाली होती. तसेच जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.