हरारे
झिम्बाबे सरकारने अलीकडेच आपल्या प्रलंबीत राहिलेल्या 28 लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. सदरची पोटनिवडणूक 26 मार्चला होणार असून 2023 च्या मध्यावर होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीची ही रंगित तालीम असणार आहे. झिम्बाबेचे अध्यक्ष इमरसन मंगागवा यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. 2020 मध्ये सदरच्या 28 जागांवर पोटनिवडणूक व्हायची होती. जी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पुढे ढकलण्यात आली होती. अखेर सदरच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आल्याने सत्ताधारी आणि इतर पक्षांनी आता तयारीला सुरूवात केली आहे. या निवडणुकीसोबत स्थानिक पोटनिवडणूकही त्याच दिवशी होणार आहे. या जागांवर विरोधीपक्ष मूव्हमेंट फॉर डेमोक्रेटिक चेंज पक्षाचे प्राबल्य आहे. 27 जागांवर होणाऱया या निवडणुकीवर अनेक पक्षांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.