‘रईस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री लवकरच झी थिएटरचा शो ‘यार जुलाहे’मध्ये दिसून येणार आहे. झी नेटवर्कच्या या घोषणेनंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटविण्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
या सीरिजमध्ये माहिरा ही गुलजार यांच्या कविता स्वतःच्या शैलीत वाचताना दिसून येणार आहे. या सीरिजचा पहिला एपिसोड 15 मे रोजी प्रसारित होईल. टाटा स्कायवर दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता तो पाहता येणार आहे. या एपिसोडमध्ये अहमद नदीम कासमी यांची लोकप्रिया कथा ‘गुरिया’चे वाचन माहिरा करणार आहे.
2019 मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानबद्दल संतापाची भावना निर्माण झाल्याने सरकारने काही पावले उचलली होती. यात पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय सामील होता.