अडचणीत, लोकांची गैरसोय, संतप्त लोकांनी काम रोखले
प्रतिनिधी /वास्को
झुआरीनगरात गॅस वाहिनीसाठी खोदकाम करताना रस्त्यावरील साकव तोडण्यात आल्याने या भागात शुक्रवारी एकच गोंधळ माजला. सांकव अर्धा कापण्यात आल्याने वाहतुकही अडकून पडली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सांकवाळचे सरपंच व स्थानिक पंचांच्या सहभागाने गॅस वाहिनीचे काम रोखून धरले. सदर साकव पुन्हा बांधून सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच पुढील काम करण्यास दिले जाणार आहे.
झुआरीनगर भागात सध्या इंडियन ऑईल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेडची भुमीगत गॅस वाहिनी घालण्यात येत असून खासगी कंत्राटदाराकडून हे काम करण्यात येत आहे. या कामात निष्काळजीपणाही आढळून येत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे. शुक्रवारी सकाळी झुआरीनगर बिर्ला येथील मस्जीदीसमोरील सांकव हे काम करताना अर्धा तोडण्यात आला. या सांकवाखालून तेथील मोठय़ा लोकवस्तीचे सांडपाणी वाहत असते तसेच पावसाठी पाण्याचीही हीच मुख्य वाट आहे. हा साकव गॅस वाहिनी घालण्यासाठी कोणालाही कल्पना न देता त्या कामगारांनी तोडला. त्यामुळे त्या मुख्य रस्त्यावरील पूर्ण साकव कमकुवत होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. साकव तोडण्यात आल्याने अर्धा रस्ता वाहतुकीला बंद झाला. त्यामुळे वाहतुक अडकून पडली. लोकांचीही गैरसोय झाली. या प्रकाराने स्थानिक लोक संतप्त झाली. लोकांनी गॅस वाहिनीचे कामच बंद पाडले.
या घटनेची माहिती मिळताच सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले व पंच आरीश कादर घटनास्थळी दाखल झाले. त्यानीही संबंधीत कंत्राटदाराला साकवाच्या हानीबद्दल जाब विचारून काम बंद ठेवण्याची सुचना केली. सदर कंत्राटदाराने मुख्य रस्त्यावरील साकवाला कोणतीही हानी न पोहोचवता गॅस वाहिनी घालण्याचे आश्वासन सथानिक पंचांना दिले होते. मात्र, तरीही निष्काळजीपणे साकव तोडून गोंधळ निर्माण केला. तोडलेला साकव पुन्हा बांधून तो सुरक्षीत असल्याची हमी मिळाल्यानंतरच गॅस वाहिनीचे काम सुरू करावे. तोपर्यंत काम बंदच ठेवण्याची सुचना स्थानिक नागरीकांना कंत्रटदाराला केली आहे. सध्या या ठिकाणी अर्ध्याच रस्त्याचा वापर येणाऱया जाणाऱया वाहतुकीसाठी होत आहे. या ठिकाणी अपघातांचा धोकाही निर्माण झालेला आहे.