प्रतिनिधी / शिरोळ
एकोणीस वर्षाच्या कॉलेज विद्यार्थिनीचा हात धरून माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे लग्न कसे होते बघतो असे म्हणून शिविगाळ केली असल्यची फिर्याद टाकवडे ता शिरोळ येथील संबंधित विद्यार्थिनीने शिरोळ पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, टाकवडे ता शिरोळ येथील संशयित आरोपी शैलेश अनिल हुपरीकर याने गेले दोन वर्षे झाली संबंधित तरुणीस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत होता इचलकरंजी येथे कॉलेजला जात असताना सातत्याने संबंधित विद्यार्थिनीचा हात पकडून तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या घरच्यांना ठार मारीन तसेच तुझे नग्न फोटो एडिट करून अपलोड करणार अशी धमकी सातत्याने देत होता 27 जून रोजी रात्री बारा वाजता संबंधित विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन आई व काकूच्या समोरच हात पकडून अश्लील शिवीगाळ करून घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.