ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी राजीनामा दिला आहे. एका आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, केविन मेयर यांनी निवेदन प्रसिद्ध करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला अमेरिकेत व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. यावरुन टिकटॉकच्या कर्मचाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात भावना भडकवत असून फेरनिवडणुकीसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मेयर यांनी राजीनामा देताना कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, खूप जड अंतकरणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केविन मेयर यांच्या जागी जनरल मॅनेजर व्हेनसा हंगामी सीईओ म्हणून काम पाहणार आहेत. जून महिन्यात केविन मेयर यांनी टिकटॉकच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.