भारताच्या तुलनेत चीनमध्ये लोक दुप्पट वेळ टीव्ही पाहण्यात घालवितात. मात्र भारतात इंटरनेटवर वेळ चीनपेक्षा जास्त दिला जातो. चीनी लोक काहीही खाऊ शकतात. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे पती राजपुत्र फिलिप यांनी म्हटले होते, की चीनी लोक विमान आणि लाकडी खुर्ची वगळता काहीही खाऊ शकतात. हे देखील त्यांच्या अधिक झोपेचे कारण समजले जाते. टीव्ही पाहता पाहता चरत राहणे ही सवय चीन आणि भारतात सर्वाधिक असल्याचे दिसून येते. यामुळे या देशांमधील लोकांना पचनाच्या समस्याही उद्भवतात, असे आढळून आले आहे.
90 टक्के वेळ...
जगभरात बव्हंशी लोक दिवसाच्या 24 तासांपैकी 90 टक्के वेळ झोपणे, खाणे, विश्रांती घेणे, मनोरंजन आणि गप्पा मारणे यात घालवतात असा आश्चर्यकारक निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. मग लोक काम केव्हा करतात हा प्रश्न पडणे शक्य आहे. तथापि, काम करतानाही लोक गप्पा मारतात. तसेच सुटी व रजेच्या काळात लोक काय करतात याचाही समावेश यात झालेला आहे.
खाणेपिण, मनोरंजन यांचे ठीक आहे. पण हे सर्व करण्यासाठी पैसा हवा. तो मिळविण्यासाठी काम करणे हे ओघाने आलेच. तेही चीनी लोक भारतीय लोकांपेक्षा प्रतिदिन 45 मिनीटे जास्त करतात. पाकसिद्धीतही (खाणे बनविणे) भारत आणि चीनचे लोक जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त व्यतीत करतात. चीनी लोक भारतीयांपेक्षा केवळ 45 मिनिटे काम जास्त करीत असले तरी उत्पन्न मात्र चौपट अधिक कमावतात असेही दिसते. एकंदर, ‘जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हणतात ना, तेच खरे वाटल्याशिवाय रहात नाही.