बाजारमूल्य 13 लाख कोटींवरः आगामी काळात रिलायन्ससोबत स्पर्धा
मुंबई
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) 13 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य प्राप्त करत दुसऱया क्रमांकावर राहिली आहे. कंपनीने मंगळवारी 13 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केल्यानंतर पुन्हा बुधवारी 13.18 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात यश मिळवलं आहे.
मागील 1 महिन्यात कंपनीचे समभाग 15 टक्क्यांनी वाढले आहेत. पुन्हा या घडीला आणखीन 52 आठवडय़ांचा टप्पा प्राप्त केला आहे. बुधवारी हलक्या वाढीसोबत समभाग 3,550 रुपयांवर टेडींग करत आहेत. याचदरम्यान कंपनीच्या तिमाही अहवालाचे आकडे सादर करण्यात आल्यानंतर त्यामधील मजबूत कामगिरीचा प्रभाव अजून बाजारात असल्याची माहिती आहे.
मंगळवारपर्यंत समभागात 2.28 टक्क्यांची तेजी राहिली होती. या सोबत रिलायन्स इंडस्ट्रिजच्या बाजारमूल्यासोबत स्पर्धा करण्याची शक्यता आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजारमूल्य हे 13.70 लाख कोटी रुपये आहे. चालू महिन्यात बीएसई सेन्सेक्समध्ये 6 टक्क्यांची यात वाढ राहिली आहे. टीसीएसचे समभाग 11 टक्क्यांनी वाढले आहेत. दिवसागणिक शेअर बाजारातील सेन्सेक्सचा प्रवास हा तेजीकडे होत आहे. सध्या सेन्सेक्सने 56 हजारचा टप्पा प्राप्त केला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार टीसीएसच्या समभागासाठी 3,650 चे ध्येय निश्चित केले आहे. तर ब्रोकरेज फर्मच्या माहितीनुसार नियर टर्ममध्ये कंपनी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.