प्रतिनिधी / सातारा :
‘शेतीशिवाय मजा नाय’ अशी वाक्य गाडीच्या पाठीमागे लिहून शेतकरी असल्याचे अभिमानाने काहीजण सांगतात. परंतु, सातारा शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले संजय साबळे यांनी गेल्या तीन वर्षांपासून टेरेसवर ड्रॅगन फ्रुटची झाडे लावली आहेत. आता ती चांगलीच बहरली आहेत. ड्युटीवरून घरी गेल्यानंतर उरलेल्या वेळात साबळे शेतीकडे लक्ष देतात. ड्रॅगन फ्रुट या परदेशी फळाचे नावीन्य वाटल्याने त्यांनी टेरेसवर त्याची लागण केल्याचे सांगितले.
साबळे हे वडूथ येथील रहिवाशी असून, त्यांनी एक प्रयोग म्हणून घराच्या टेरेसवर ड्रॅगन फ्रुट नावाची वनस्पतीची रोपे लावली. तीन वर्षांपूर्वी लावलेल्या या झाडांना आता चांगलाच बहर आला आहे. तब्बल तीन वर्षांनतर झाडांना फळे लागली असल्याने त्यांना कुतूहूल वाटले आहे. त्यांनी टेरेसवर लावलेल्या ड्रॅगन फ्रुटचे वडूथ-आरळे परिसरात कौतुक होत आहे.