प्रतिनिधी/ बेळगाव :
लॉकडाऊनमुळे संकटात असणाऱया राज्यातील विविध कामगार वर्गांसाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 1600 कोटीचे विशेष पॅकेज घोषित केले आहे. मात्र यामध्ये टेलरिंग व्यवसाय करणाऱयांचा व कामगारांचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यात टेलरींग व्यवसायावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत. लॉकडाऊनमुळे या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे. अशा संकटकाळात मुख्यमंत्र्यांनी टेलर कामगारांना मासिक पाच हजार रुपये मदत करावी, अशी मागणी टेलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन गुरुवारी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना देण्यात आले. असोसिएशनचे राज्य पदाधिकारी कृष्णा भट्ट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कपडे शिवून जीवन जगणारे राज्यातील लाखो टेलर आज संकटात सापडले आहेत. हे कामगार असंघटीत असून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळावी यासाठी असोसिएशनच्या वतीने वारंवार प्रयत्नही करण्यात येत आहेत. आता लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी मासिक पाच हजार रुपयांची मदत देण्यात यावी आधीच रेडिमेड कपडय़ामुळे टेलर व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे., सध्याच्या लॉकडाऊनमुळे या संकटात आणखी भर पडली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करावा,निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी ाr कृष्णा भट्ट, संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ सरोदे, सचिव नारायण जवळकर, सुरेश पिसे, शिवानंद कोपर्डे, अमोल बेदे आदी उपस्थित होते.