टेक्सास
इलेक्ट्रीक वाहन बनवणाऱया टेस्ला कंपनीच्या 2020 मधील वाहन विक्रीत 36 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने 2020 मध्ये 4 लाख 99 हजार 500 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीचे वर्षाला 5 लाख वाहन विक्रीचे उद्दिष्ट मात्र थोडक्मयात हुकलं आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर काळात कंपनीने 1 लाख 80 हजार 570 स्पोर्टस् युटिलीटी व्हेईकल व सेडानची विक्री केली आहे. कोरोना महामारीची सुरुवात होण्याआधीच वर्षात 5 लाख वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट ठरवले होते. उन्हाळय़ात अमेरिकेतील कारखान्यात उत्पादन बंद ठेऊनही कंपनीने लक्ष्याप्रती चांगली आगेकूच केलेली दिसली.