ऑनलाईन टीम / टोकियो :
इस्रायलच्या ज्युडो खेळाडूसोबत खेळण्यास नकार देणाऱ्या अल्जेरियाच्या खेळाडूला ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याला टोकियोमधून माघारी पाठवण्यात आले आहे.
फेथी नॉरिन असे निलंबित करण्यात आलेल्या अल्जेरियाच्या खेळाडूचे नाव आहे. त्याला ज्युडोच्या 73 किलो वजनी गटातील दुसऱ्या फेरीत सोमवारी इस्त्रायलच्या खेळाडूशी लढायचे होते. त्याआधी फेथीला सुदानच्या मोहम्मद अब्दुलरसूल विरुद्धची लढत जिंकावी लागणार होती. मात्र, फेथीने या इस्रायली खेळाडूसोबत खेळण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने फेथी नॉरीन आणि त्याचे प्रशिक्षक अमर बेनिखाल्फ यांना स्पर्धेतून निलंबित केले.