वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया टोटेनहॅम फुटबॉल क्लबकडून प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांची हकालपट्टी करण्यात आली. मॉरिन्हो यांनी 17 महिन्यापूर्वी व्यवस्थापकपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर टोटेनहॅम संघाची कामगिरी निराशाजनक झाली.
2019 च्या नोव्हेंबरमध्ये टोटेनहॅम फुटबॉल क्लबने मॉरिन्हो यांची व्यवस्थापकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर टोटेनहॅम संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंम मजल मारली. त्यानंतरच्या फुटबॉल हंगामात टोटेनहॅम संघाची कामगिरी असमाधानकारक झाली. गेल्या डिसेंबरमध्ये टोटेनहॅमचा संघ पहिल्या स्थानावर होता पण त्यानंतर खराब कामगिरीमुळे सध्या टोटेनहॅमचा संघ सातव्या स्थानावर फेकला गेला असल्याची माहिती या संघाचे चेअरमन लेव्ही यांनी दिली आहे. चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामात टोटेनहॅम क्लबची कामगिरी निकृष्ट झाली. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील टोटेनहॅम सामना साऊदम्पटन बरोबर होणार असून या सामन्यापूर्वी दोन दिवस अगोदरच मॉरिन्हो यांची व्यवस्थापकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. टोटेनहॅम संघाला 2008 पासून लीग फुटबॉल स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता या टोटेनहॅमचा लीग स्पर्धेतील अंतिम सामना मँचेस्टर सिटी संघाबरोबर होणार असून या सामन्यावेळी मॉरिन्हो व्यवस्थापक म्हणून दिसणार नाहीत.