पुलाची शिरोली / वार्ताहर
टोप ता. हातकणंगले येथील इंद्रायणी खणीत पडून गंगाराम नगर येथील एक जण मयत झाला. दिलीप बाबुराव पवार रा. गंगाराम नगर टोप वय वर्षे ५५ असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना चार जानेवारी रोजी घडली होती.
मयत दिलीप पोवार हा लघूशंकेस दगडाच्या खाणीकडे गेला होता. तो बराचवेळ झाला तरी परत आला नाही. म्हणून त्याचा भाऊ परशुराम हा बघण्यास गेला होता. त्यावेळी दिलीप हा पाण्यात पडला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाणबुड्यास आणून शोध घेतला असता दिलीप पोवार याचा मृतदेह सापडला. याबाबत परशुराम पोवार याने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.