शिवजयंती अवघ्या आठवडाभरावर : शिवजयंती मंडळांकडून आतापासूनच पर्यायी व्यवस्थेची तयारी
प्रतिनिधी /बेळगाव
शिवजयंती अवघ्या आठवडाभरावर आली तरी अद्याप चित्ररथासाठी वाहनांच्या चेस्सी मिळत नसल्याने शिवजयंती उत्सव मंडळे अडचणीत सापडली आहेत. चेस्सी मिळाव्यात यासाठी मंडळे ट्रक बॉडी बिल्डिंग कारखान्यांच्या फेऱया मारत आहेत. ट्रकची कमी झालेली संख्या, त्यातच बीएस-6 वाहनांच्या वाढलेली चेस्सी यामुळे यावषी बऱयाच मंडळांना चेस्सी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आतापासूनच पर्यायी व्यवस्था मंडळे करत आहेत.
बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणूक काढली जाते. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे मिरवणूक झालेली नसल्याने यावषी मोठय़ा उत्साहात शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. यावषी बेळगाव, शहापूर, वडगाव येथील अंदाजे 73 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. प्रत्येक मंडळ शिवचरित्रावर प्रसंग सादर करणार असल्याने त्यांना वाहनांच्या चेस्सीची आवश्यकता भासणार आहे.
मंडळे शिवचरित्रातील प्रसंग चित्ररथ मिरवणुकीत सादर करतात. हे प्रसंग नव्या वाहनांच्या चेस्सीवर सादर केले जातात. नवीन ट्रक बॉडी बिल्डिंगसाठी बेळगावमध्ये येतात. जुना धारवाड रोड, समर्थनगर, ऑटोनगर, राष्ट्रीय महामार्गानजीक बॉडी बिल्डिंग करणाऱयांची संख्या सर्वाधिक आहे. बॉडी बिल्डिंग करणारे चेस्सीला प्लायवूड लावून मंडळांना देतात. त्यामुळे मंडळांना सेट लावणे, वाहतूक करणे सोयीचे होते.
सहा, बारा चाकी ट्रकची भासतेय कमतरता
स्टील व डिझेलचा दर वाढल्याने ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. नवीन ट्रक खरेदीला बेक लागल्याने शिवजयंती मंडळांना चेस्सी कमी पडत आहेत. सध्या काम सुरू असणारे ट्रक बीएस-6 असल्याने ते मंडळांना उपयुक्त ठरत नाहीत, तसेच त्यांची हाताळणी कठीण आहे. 6 व 12 चाकी ट्रकची संख्या कमी झाल्याने यावषी मंडळांना चेस्सी कमी पडणार आहेत.
-सिदाई पाटील (ट्रक बॉडी बिल्डर)
चेस्सी नसल्याने मंडळांची होतेय दमछाक
वाहनांची चेस्सी असेल तर देखावे सादर करणे सोयीचे होते. परंतु चेस्सी उपलब्ध नसल्याने आता ट्रॉलीचा वापर करावा लागणार आहे. 2019 ला एकाच ट्रालीवर देखावा सादर करण्यात आला होता. परंतु देखावा सादर करताना अडचणी येत असल्याने दोन ट्राली जोडण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. परंतु इतर मंडळांच्या पदाधिकाऱयांची चेस्सी शोधण्यासाठी दमछाक होत आहे.
– राघवेंद्र येळ्ळूरकर (अध्यक्ष-संघर्ष युवक मंडळ, मुजावर गल्ली,)
ट्रॉली वापरून सादर करावा लागणार देखावा
आमचे मंडळ दरवषी शिवजयंतीसाठी शिवचरित्रातील प्रसंग सादर करते. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी नव्या गाडय़ांची चेस्सी महत्त्वाची असते. यावर्षी बेळगावमध्ये चेस्सी मिळत नसल्याने गणेशमूर्ती आणण्यासाठी वापरल्या जाणाऱया दोन ट्रॉली एकत्र करून प्रसंग सादर करावा लागणार आहे.
– अभिजित लंगरकांडे (अध्यक्ष-माळी गल्ली शिवजयंती उत्सव मंडळ)