ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव जवळपास निश्चित झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चार राज्यातील मतमोजणीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने मिशिगन आणि जॉर्जियामधील दावे फेटाळले आहेत.
मिशिगन आणि जॉर्जिया या दोन्ही राज्यात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात अटीतटीची लढाई सुरू होती. मात्र, प्रभाव समोर दिसताच ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. तसेच जॉर्जियात ट्रम्प यांच्या प्रचार टीमने 53 उशिरा आलेले बॅलेट्स ऑन टाईम बॅलेट्समध्ये मिसळल्याचा आरोप केला होता.
या आरोपांवर न्यायालयाने ट्रम्प यांना जोरदार झटका दिला आहे. ज्या बॅलेट्सबद्दल आरोप केले जात आहेत, त्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेम्स बास यांनी मिशिगन आणि जॉर्जियामधील दावे फेटाळले.