नवी दिल्ली
प्रिमीयम मोटारसायकल बनवणारी ब्रिटनची कंपनी ट्रीम्प मोटारसायकल्सने भारतात टायगर 850 स्पोर्टस् ही नवी गाडी सादर केली आहे. सदरच्या गाडीची किंमत 11.95 लाख रुपये असणार आहे. 888 सीसी इंजिनची ही मोटारसायकल भारतीय बाजारात उतरवली जाणारी कंपनीची चौथी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याआधी कंपनीने भारतात टायगर 900 प्रो, रॅली आणि जीटी या मोटारसायकली सादर केल्या आहेत. टायगर गाडीच्या माध्यमातून कंपनीने आपली लोकप्रियता कायम राखण्यात यश मिळवलं आहे.