पलुस / प्रतिनिधी
पलुस येथील जुना सातारा रोडवर ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
महादेव कुभकण कांबळे (मुळ रा. नांदेड सध्या शिवनेरी ढाबा पलुस) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत कांबळे हा गेल्या काही वषापासुन शिवनेरी ढाबा येथे काम करीत होता. मंगळवा्री अंगराकी संकष्टी निमित्त ढाब्यास सुट्टी असल्याने तो जवळच असणार्या एका ढाब्यावर दुचाकीवरु जेवण करण्यासाठी निघाला होता. दरम्यान समोरुन आलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक दिली यावेळी महादेव याच्या डोक्यास जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला या अपघाताची नोंद पलुस पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.