घरात वावरताना मोकळाढाकळा, आरामदायी घालण्यावर भर दिला जातो. नाईट गाऊन, नाईट ड्रेस फक्त रात्री झोपताना घातले जातात. मग दिवसभर काय घालायचं? पेहरावात पटकन खाली जाताही आलं पाहिजे. तुम्हीही आरामदायी पर्यायाच्या शोधात आहात का? मग पायजमा ट्राय करता येईल. सध्या वेगवेगळ्या फ्रब्रिक्स, रंग आणि प्रिंट्सचे पायजमे मिळतात. या पायजम्यावर टी शर्ट किंवा अगदी कुर्ताही घालता येतो. घरातही स्टायलिश दिसायचं असेल तर या प्रिंट्सचे पायजमे ट्राय करता येतील.
* सध्या झेब्रा प्रिंट पायजमा खूपच लोकप्रिय झाला आहे. हा पायजमा तुम्हाला हटके लूक देईल.
* पट्टेदार पायजमाही छान दिसतो. पांढर्या पायजम्यावर काळे पट्टे खूप उठून दिसतात. तुम्ही इतर रंगांचे पायजमेही घेऊ शकता.
* किमोनो हा प्रकारही चांगलाच इन आहे किमोनो हा जपानी पेहराव आहे. हा पेहराव टी आकाराचा असतो. सध्या या पॅटर्नचे पायजमे बाजारात उपलब्ध झाले आहेत. हा प्रकार ट्रेंडी तर आहेच शिवाय आरामदायीही आहे. काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही किमोनो स्टाईलचा पायजमा विकत घेऊ शकता.