ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शुक्रवारी सायंकाळी ट्विटरची सेवा ठप्प झाल्याची तक्रार 40 हजार युजर्सने नोंदवली आहे. त्यावर ट्विटरने आज ट्विट करुन म्हटले आहे की, ‘काही युजर्सचे अकाऊंट लोड होत नाहीत. त्यावर काम सुरु आहे. लवकरच युजर्सची ही अडचण दूर होईल.’
ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ट्विटर आपल्या युजर्ससाठी लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या नव्या फिचरद्वारे युजर्स आपल्या टाइमलाइनवरही युटय़ूबचे व्हिडिओ पाहू शकतील. नव्या फिचरची टेस्टिंग सध्या अमेरिका, जपान, कॅनडा आणि सौदी अरबमध्ये केली जात आहे. आणखी चार आठवडे ही टेस्टिंग राहिल. त्यानंतर या फिचरच्या लाँचिगबाबतचा निर्णय घेण्यात येईल.