डिचोली / प्रतिनिधी
डिचोली मतदारसंघात भाजपची उमेदवारीच्या मुद्यावरुन तयार झालेला गुंता अखेर सुटला असून सभापती तथा आमदार राजेश पाटणेकर यांंच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
या निर्णयासाठी शुक्रवार दि. २१ जाने. रोजी डिचोलीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वांचा आग्रह आणि विनंतीला मान देत पाटणेकर यांनी अखेर होकार दिला.
या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रभारी महेश जाधव, राजेश पाटणेकर, वल्लभ साळकर, मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, नगरसेवक, सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.