दिवसभर सलगपणे पावसाची बरसात : सर्वत्र पुरसदृष्य स्थिती : अंजुणे धरणाचे चारही दरवाजे सोडले सतर्कतेचा इशारा
डिचोली / प्रतिनिधी
वादळी वाऱयासह सलगपणे कोसळणाऱया पावसाने डिचोली तालुक्मयाला मंगळ. दि. 4 जुलै रोजी अक्षरशः झोडपून काढले. पावसाने दिवसभर अविश्रांत बरसात केल्याने तालुक्मयातील जनजिवन विस्कळीत झाले.अनेक ठिकाणी जोरदार वाऱयामुळे झाडे पडण्याच्या घटना घडल्या. डिचोली व साखळीतील नद्यांमधील पाण्याची पातळी बऱयाच प्रमाणात वाढली होती. तसेच केरी सत्तरीतील अंजुणे धरणातील अतिरिक्त पाणी सोडण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू होती.
गेल्या काही दिवसांत पावसाने उसंत घेतल्याने लोकही बिनधास्त होते. व त्याच दृष्टीने लोकही वावरत होते. मात्र सोमवारी दुपारनंतर अचानकपणे पावसाने जोर धरल्याने लोकांची तारांबळ उडाली. या जोरदार पावसाबरोबरच जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडांचीही पडझड झाली. पावसाचा तोच जोर दुसऱया दिवशी म्हणजे मंगळवारीही चालूच राहिल्याने दिवसभर तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांमध्ये काठोकाठ पाणी भरून वाहत होते.
साखळीतील वाळवंटी नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले होते. सकाळीपासूनच सुरूच असलेल्या पावसामुळे नदीतील पाण्याने सुचना पातळी गाठली होती. त्यामुळे बाजारातील नाल्यात साचणारे पाणी पंपींग करून बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सदर प्रक्रिया संध्याकाळी उशीरापर्यंत सुरूच होते. साखळी भागातील सर्वच नद्यांमधील पाणी वाढला होते. त्यामुळे सर्वत्रच पुरसदृष्य स्थिती दिसून येत होती.
केरी सत्तरीतील अंजुणे धरणातील पाण्याने 91.34 मीटर इतकी पातळी गाठल्यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी समोरील नदीत सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच असल्याने धरणातील पातळी झपाटय़ाने वाढली. त्यामुळे सदर धरणातील पाणी चारही दरवाजे खोलून सोडण्यात आले. धरणाच्या समोरील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
डिचोलीतील नदीलाही दिवसभराच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाढले होते. नदीकिनारी असलेल्या सर्व नाल्यांमध्ये पाणी काठोकाठ भरून होते. नदीकिनारी असलेल्या सर्व नारळ बागायतींमध्ये पाणी भरून होते.
दिवसभराच्या जोरदार पाऊस व वाऱयामुळे डिचोली तालुक्मयात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तालुक्मयातील अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. मात्र डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांंनी झाडे हटविताना बचाव कार्य केले. सुधा कॉलनी बोर्डे डिचोली येथे एका घरावर आंबाडय़ाचे झाड पडल्याने नुसकार झाले. काही ठिकाणी घरांवर तसेच मोटारगाडय़ांवरही झाडे पडल्याने नुकसान झाले.