वार्ताहर /लाटंबार्से
गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात खेडोपाडय़ात शिक्षण संस्था चालू करून शिक्षणाची गंगा राज्यभरात पोहोचवली, असे प्रतिपादन ज्ये÷ शिक्षण तज्ञ अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
बोर्डे-डिचोली येथे गोमंतक मराठा समाजाच्या जागेत शैक्षणिक प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत समाजाचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष आनंद वाघ्रमेकर, बांधकाम समितीचे अध्यक्ष गोरख मांदेकर, सचिव प्रसाद नाईक, खजिनदार संदेश नाईक, केंद्रीय समितीचे सचिव मंगेश कुंडईकर, श्रीकृष्ण अस्कावकर, केंद्रीय महिला समितीच्या अध्यक्ष शुभदा कळंगूटकर, तालुका समितीचे इतर अध्यक्ष, इतर पदाधिकारी, सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आज गोमंतक मराठा समाजाने कितीतरी रत्ने देशासह जगाला दिली. या समजामधून द्वेष किंवा दोन ज्ञातीमधील इर्षा कुठेच दिसली नाही. पूर्वीपासून संघर्ष, जोखीम, विघ्ने पत्करून देशाचे नेतृत्व करण्याचे भाग्यही या समाजाला लाभलेले आहे. प्रत्येकवेळी सकारात्मक विचारविनिमय करून सगळय़ांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न या समाजाने केला आहे. या यशाचे कळस गाठताना किंवा हे सर्व करताना पुष्कळ लोकांचा हातभार लागलेला आहे. हे दयित्व आणखी पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे, असे वेलिंगकर यावेळी म्हणाले.
यावेळी गोरख मांदेकर म्हणाले, गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी पणजी येथे समाजाची प्रशस्त इमारत आपल्या कल्पकतेने उभी केली. दहावी, बारावी पास झाल्यानंतर जेईई, नीट, यूपीएससी, आयएएस, आयपीएस, सीए सारख्या उच्च शिक्षण घेणाऱयांसाठी अगदी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन दिले जाईल. यासाठी गोव्यातील तसेच इतर राज्यातून मार्गदर्शक आणले जातील. त्यासाठी राजस्थानतील शिक्षक, मार्गदर्शक बरोबर बोलणी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गदर्शनाचा लाभ समाजाबरोबर इतर समाजाचे बांधवही घेवू शकतील. हा शैशणिक प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असून तत्पूर्वी जून पासूनच पणजी येथील समाजाच्या इमारतीत हे प्रशिक्षण सुरू केले जाईल.
तर केंद्रीय समितीचे अध्यक्ष आनंद वघुर्मेकर म्हणाले, या शैक्षिणिक प्रकल्पासाठी लागणारे सर्व सोपस्कार केंद्रीय समिती आणि बांधकाम समितीच्या प्रयत्नातून पूर्ण झालेले आहे. ही जागा शांताराम बोर्डेकर यांनी समाजाला दानपत्राने दिली आहे. या इमारतीचे वास्तू शिल्पकार येजवेंद्र नाईक यांनी सांगितले की या वस्तू मध्ये पहिल्या मजल्यावर बाहेरील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय, तर तळमजल्यावर दुकाने, पार्किंगची व्यवस्था केली जाईल. जर कोणाला एखादा वर्ग दान करायचा असेल तर त्या वर्गासाठी त्याचे नाव देण्याची तरतूद या वास्तू मध्ये केलेली आहे.
सुरुवातीला सौ. व श्री आनंद वाघुर्मेकर यांच्या याजमानपदाखली भूमिपूजन करण्यात आले. शैशणिक प्रकल्पाच्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. केंद्रीय समितीचे सचिव मंगेश कुंडईकर यांनी आभार मानले.