नवी दिल्ली
डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसात डिझेलच्या विक्रीत वर्षाच्या तुलनेत पाहता 5.2 टक्के इतकी घट झाली असल्याचे सांगितले जाते. पेट्रोल विक्रीत मात्र याउलट 9.5 टक्के इतकी वाढ झाल्याचे समजते. नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसातील खपाचा विचार करता डिसेंबरमधील डिझेल विक्री 3.4 टक्के कमी आणि पेट्रोलची विक्री मात्र 1.6 टक्के वाढल्याचे दिसून आले आहे. विमानासाठी लागणाऱया इंधनाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. वर्षाच्या तुलनेत जेट इंधन विक्रीत 47 टक्के घट झाली आहे.