बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर ग्रामीण लोकसभेचे खासदार डी. के. सुरेश यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे निषपन्न झाले. खासदार सुरेश यांनी कोरोना चाचणी केल्यांनतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी डी. के. सुरेश आणि डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी व इतर ठिकाणी छापे टाकले आहेत.
डी. के. सुरेश यांनी माझ्या संपर्कात आलेल्या सर्व मित्र व कुटूंबातील सदस्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. तसेच सोमवारी माझ्याबरोबर सीबीआयचे अधिकारी आणि मीडिया प्रतिनिधी होते त्यांनाही मी चाचणी करण्याची विनंती करतो, असे सुरेश यांनी ट्विट करून म्हंटले आहे.
डी. के. सुरेश यांचा कोरोना अहवाल आल्यानंतर त्यांनी आपली तब्बेत ठीक असून मी अलग राहत असून डॉक्तरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असल्याचे म्हंटले आहे.