बेंगळूर
दुचाकी क्षेत्रातील कंपनी डुकाटी नव्या वर्षात 11 मोटरसायकली भारतात लाँच करणार असल्याचे समजते. दुसऱया तिमाहीत इटलीतील कंपनी डुकाटी स्ट्रीटफायटर व्ही 4 एसपी, डेझर्ट एक्स या गाडय़ा सादर करण्याचा विचार करते आहे. यात स्क्रॅम्बलर 1100, पनिंगले व्ही 2 अशा गाडय़ाही समाविष्ट आहेत. मागच्या वर्षी 15 मोटारसायकली कंपनीने सादर केल्या होत्या.