प्रतिनिधी / पणजी
नगरविकास खात्याच्या संचालक डॉ. तारीक थोमस, आयएएस यांच्यातर्फे कारोनावर नियंत्रय मिळविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये खासकरुन सार्वजनिक ठिकाणांची सॅनिटायझेशन याचा समावेश आहे. अशावेळी खोर्ली, गोवा येथील डेक्कन फाईन कॅमिकल्स(इंडिया) प्रा. लि. यांच्यातर्फे सीएसआरच्या पुढाकारे 2000 लिटर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन नगरविकास खात्याला देण्यात आले.
सदर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन जंतुनाशक म्हणून वापरला जातो, त्यामुळे या सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन नगरविकास खात्याला मोठय़ा प्रमाणात उपयोगी पडणार आहे. राज्यातील विविध संस्था अशाप्रकारची जंतुनाशक वापरत आहेत.
डेक्कनच्या मानव संसाधन प्रमुख योगेश अरोरा व इएमएस प्रमुख गौरेश भेंडे यांनी नगरविकास खात्याचे सहाय्यक आभियंता अमित शिरोडकर यांना हे जंतुनाशक सुपुर्द केले.