चंदीगड
डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून (एसजीपीसी) पॅरोल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मागे घेण्यात आाrल आहे. गुरमीत राम रहिमला 21 जानेवारी रोजी 40 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता. राम रहीम सध्या उत्तरप्रदेशच्या बागपत येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात वास्तव्यास आहे. राम रहिमला तीन महिन्यांपूर्वी देखील 40 दिवसांचा पॅरोल मिळाला होता.