वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिसेंबर 2021 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षामध्ये डेल टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीला 64 टक्क्यांची विक्रमी व्यवसाय वृद्धी झाल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती डेल टेक्नालॉजीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे.
ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू असून चांगली कामगिरी पार पाडली आहे. उत्पादकतेमध्ये सुधारणा झाली असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अलोक ओहरी यांनी स्पष्ट केले आहे.
डेल टेक्नॉलॉजी इंडियाने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 64 टक्क्यांची वृद्धी प्राप्त करत 2021 च्या चौथ्या तिमाहीत वर्षाच्या आधारे 61 टक्क्यांची वृद्धी नेंदवली आहे. कंपनीने मात्र वृद्धीची आकडेवारी वगळता अन्य कोणत्याही आकडेवारीचा खुलासा केलेला नाही.