कोल्हापूर /प्रतिनिधी
डॉक्टर युवतीस लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी लगट करून तिचा विनय भंग केल्याप्रकरण अभिनेत्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. जितेंद्र शैलाजी पोळ (वय ३२ रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा जेल परिसर कळंबा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की. दूरचित्रवाणी वरील एक सुप्रसिद्ध मालिकेत जितेंद्र पोळ काम करतो. शादी डॉट कॉम वेबसाईटवरून संशयिताची युवतीशी परिचय झाला. ती युवती डॉक्टर असल्याचे पोळ ला समजले. यानंतर त्याने संबधित युवती सोबत ओळख वाढवून मैत्री केली. काही दिवसांनी तिला भेटल्यानंतर तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. संबंधित तरुणीने याबाबतची फिर्याद राजरामपुरी पोलीस ठाण्यात दिली. शनिवारी सकाळी पोळ ला अटक करण्यात आले.
संशयिताला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.