प्रतिनिधी /पणजी
एसटी समाजाचे प्रमुख नेते तसेच राय येथील जिल्हा पंचायत सदस्य डॉमनिक गावकर यांनी सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांच्या उपस्थितीत ते आपमध्ये दाखल झाले.
तीनवेळा जिल्हा पंचायत सदस्य असलेले गांवकर आप मध्ये सामील होत आहेत हा आपल्या सर्वांसाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. गांवकर हे गोव्यातील एक प्रमुख नेते आहेत. त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. राय मतदारसंघात त्यांनी भरीव काम केले असून सलग तीनवेळा त्यांनी ही जागा जिंकली आहे. ’आप’मध्ये त्यांच्या प्रवेशाने युवकांना आणि आमच्या पक्षाच्या तळागाळातील सदस्यांना मोठी चालना मिळाली आहे अस म्हांब्रे म्हणाले.
सर्वसामान्य गोमंतकीयांच्या कल्याणासाठी केलेले कार्य तसेच राय येथील शेतकऱयांना मोफत भात कापणी यंत्रे देणे, अनेकांना वैद्यकीय आणि शिक्षणात मदत करणे यासारख्या अनेक सामाजिक कार्यासाठी राय, लोटली आणि कामुर्ली भागात ते प्रसिद्ध आहेत. अनुसूचित जमाती महामंडळाचे ते संचालक होते तसेच 2012 मध्ये कुडतरीतून त्यांनी विधानसभा निवडणुकही लढवली होती.
अरविंद केजरीवालांची दूरदृष्टी आणि केजरीवाल मॉडेलने प्रभावित झाल्याने आपण आपमध्ये प्रवेश केला, असे गांवकर यांनी सांगितले. दिल्लीत विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील आपच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
हा पक्ष सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पार्टीला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरातून जनआंदोलन सुरू झाले आहे. ’आप’च्या रोजगार यात्रेने गोव्यातील तरुणांच्या बेकारीच्या समस्येवर प्रकाश पडला आहे, असे गावकर म्हणाले. “साथीचा रोगामुळे सर्वसामान्य गोमंतकीयांना फार मोठा फटका बसला आहे. लोकांनी नोकऱया गमावल्या आहेत. त्यांचे उत्पन्नाचे स्त्राsत गमावले आहेत आणि सरकार याकडे डोळेझाक करत आहे. शेतकऱयांचे हाल होत असूनही सरकार त्यांना कापणी यंत्रे देत नाही. त्यामुळे आता वेळ आली आहे, बदल गरजेचे असून बदलासाठी आप एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, म्हांबरे यांनी बोलताना, सत्ताधाऱयांनी दिलेल्या खोटय़ा आश्वासनांना जनता कंटाळली असल्याने संपूर्ण गोव्यामधून लोक आपकडे वळत आहेत. हा टेंड कायम राहणार आहे, असे सांगितले.