वार्ताहर/ देशमुखनगर
इंडियन अर्थोपेडीक असोशियन यांची नुकतीच 66tप् मॅशनल कॅन्फरेंस 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान डॉ.श्यामा मुखर्जी स्टेडियम,गोवा येथे संपन्न झाली.
यावेळी,उपस्थित महाराष्ट्र अर्थोपेडीक असोशियनचे अध्यक्ष डॉ.अजित शिंदे,उपाध्यक्ष डॉ. वासुदेव गाड्गोने तसेच सेक्रेटरी डॉ.नारायण कर्णे यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला.
या वेळी,सातारा जिल्याचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आणि मोरया फौंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,सातारा येथील कार्यकारी संचालक डॉ.आशितोष भोसले यांना वैदयकिय क्षेत्रातील (अस्थिरोग) दरवर्षी दिला जाणारा “डॉ.स्टीव्ह रोचा पुरस्काराने सन्मानित केले.
प्रसंगी डॉ.आशितोष भोसले यांनी “खुब्याचा अस्थिभंग’’या विषयावर शोध निबंध सादर केला.या शोध निबंधाला यावर्षीचा सर्वक्रृष्ट शोध निबंध म्हणून सन्मानित करून डॉ.आशितोष भोसले यांना यावर्षीचा वैदयकिय क्षेत्रातला “डॉ.स्टीव्ह रोचा पुरस्काराने सन्मानित केले.
तसेच सातारा जिल्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला असे गौरवद्गार मोरया फौंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,सातारा येथील अध्यक्ष श्री.धनंजय शेडगे यांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त केले.
तसेच सर्व सामाजिक आणि वैदयकिय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदाचा वर्षीव घेत आहे.