जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केले विचार व्यक्त
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मात्र आता कोरोना आटोक्मयात आला असून यावषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि दलित संघटनांनी घेतला आहे.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विविध दलित संघटनांचे नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यादिवशी सकाळी 8 वाजता अशोक चौक येथून ज्योतीचे प्रयाण होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील उद्यानामध्ये ज्योतीचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ती ज्योत धर्मवीर संभाजी चौक येथून निघणाऱया मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे.
मिरवणुकीत चित्ररथ देखावे
सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीमध्ये मोठय़ा संख्येने चित्ररथ देखावे सामील होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने यावषी ही जयंती साजरी करण्यासाठी सर्व ती तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सरकारी कार्यालय तसेच विविध कार्यालयांवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. शाळांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील यानिमित्त करण्यात येणार आहे. मिरवणुकीसाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त रुदेश घाळी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, समाज कल्याण विभागाच्या सहसंचालिका उमा सालीगौडर, मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, बसवराज रायाण्णगोळ, सिद्धाप्पा कांबळे, महादेव कांबळे यांच्यासह दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.