कुंभारजुवा भाजपा गटातर्फे आयोजन
वार्ताहर / माशेल
माशेल येथून आपल्या गावातून वैद्यकीय सेवेचा श्रीगणेशा करणाऱया डॉ. विनोद विनायक वेरेकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस माशेल येथील लोटस सभागृहात परिवार, मित्रमंडळी तसेच राजकीय व महनीय व्यक्तीच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. त्याच्या उपस्थितीत डॉ. विनोद वेरेकर यांनी केक कापून त्यानंतर कुंभारजुवा मतदार संघाच्या गट भाजपतर्फे डॉ वेरेकर यांचा मुख्यमंत्र्याच्याहस्ते श्रीफळ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यता आला. यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर, सचिव शिवा नाईक, नागेश फडते, समील वळवईकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, सिद्धेश नाईक, गिरीश नाईक, रोहन हरमलकर, सचिन गावडे, अच्युत धुळापकर, नरेश नाईक, राजेश नाईक, महिमा देसाई, भूषण भोमकर व इतर मंडळी उपस्थित होते.सोहळयाला मंत्री गोविंद गावडे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की विनोद वेरेकर निस्वार्थपणे गेली 35 वर्षे ग्रामिण भागातील आपल्या रूग्णांना सेवा देत आहेत. डॉक्टरची पेशा सांभाळून सामाजिक क्षेत्रातही त्याची भरीव कामगिरी केलेली आहे. भारतीय जनता पक्षात काम करीत असताना त्याचा आणि आमचा निकटचा संबंध आला. त्यामुळे डॉक्टर या नात्याने ते रूग्णांना कसे सहकार्य करतात हे जवळून पाहत आल्याचे ते म्हणाले. त्याना डॉक्टरी पदवी प्राप्त केल्यानंतर शहरात दवाखाना उघडला आला असता मात्र त्यानी वैद्यकीय सेवेसाठी आपल्या गावात माशेल गावाला प्राधान्य दिले.या सेवेतून लोकांची मने जोडली. भारतीय जनता पार्टी ते सक्रीय कार्यकर्ते असून त्याचे समाजसेवेचे काम इतरांसाठी प्रेरणादायक आहे.
यावेळी बोलताना विनय तेंडूलकर म्हणाले की कुभांरजुवे मतदार संघात 45 बुथांची बांधणी करताना डॉ. वेरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉक्टरांनी वैद्यकीय पेशाबरोबर सामाजिक कार्यतही चांगले कार्यरत असल्यामुळे मी जवळून पाहिलेले आहे. करमळी गावात रेल्वे स्टेशनवर रेल्वे न थांबता जाते त्यामुळे येथील टॅक्सीवाल्यांना धंदा मिळत नसल्याची कैफियत डॉक्टरांनी आमच्याकडे मांडली होती. त्यानंतर दखल घेत करमळीत रेल्वे थांबा केला. त्यामुळे टॅक्सी व गाडेवाल्यांना व्यवसाय सुरळीत झाला. व्यवसायिकांना धंदातही वृद्धि मिळाली होती.अमृतमहोत्सवी वाढदिनी तेंडूलकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी धाकू मडकईकर, समील वळवईकर, नागेश फडते, विनय गांवकर,प्रेमानंद शिरोडकर, रणजीत काकोडकर, चंदन वरगांवकर, मंडळ अध्यक्ष शिवा नाईक, सचिव सिद्धेश नाईक, शिरीष नाईक, रोहन हरमलकर, डॉ. गोकुळदास सावंत उपस्थित होते. डॉ. वेरेकर हे भाजपाचे कुंभारजुवा मंडळाचे उपाध्यक्ष तसेच भाजपा गोवा मेडीकल सेलचे सदस्य अशी मानाची पदे भूषविलेली आहेत. अमृतमहोत्सवी वाढदिनी त्याच्या मातोश्री सुमित्रा वेरेकर, सुरेखा आजगावकर, स्मिता काकोडकर (मावशा), त्याचप्रमाणे बहिणी वंदना उमेश नाईक, उमा व विशाखा तुळजकर, रंजना नाईक, नमीता नार्वेकर, गौरी राणे, वरदा वेरेकर यांनी 60 दिप प्रज्ज्वलीत करून ओवाळणी केली. यावेळी डॉ. विनोद वेरेकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विनय तेंडूलकर, तसेच भाजपाचे विविध गटाध्यक्ष उपस्थित होते. डॉक्टरांनी शेवटी सर्व उपस्थित कार्यकर्त्याचे तसेच हिचचिंतकाचे आभार मानले.