बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) अमली पदार्थांच्या व्यापारासंदर्भात योग्य दिशेने चौकशी करीत आहे. कर्नाटकला ड्रग्सच्या व्यापारापासून मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे, असे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी म्हंटले आहे.
गृहमंत्र्यांनी गुरुवारी ड्रग तस्कर प्रकरणी सीसीबीवर कोणताही दबाव नसल्याचे म्हंटले होते. या प्रकरणात जेवढे लोक सामील आहेत, त्या सर्वांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, मग ते राजकीय असो वा फिल्म इंडस्ट्रीतील. प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हंटले आहे.
तसेच कायद्यातील अनेक त्रुटी असल्यामुळे या व्यवसायात गुंतलेल्या लोकांवर कारवाई शक्य नाही. यासंदर्भात गृहमंत्री हे कायदा आणि संसदीय कार्यमंत्री जे. सी. मधुस्वामी आणि राष्ट्रीय कायदा प्रमुख यांच्याशी बोलले असून त्यांनी विद्यमान कायद्यात सुधारणा करून हे आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.