हातनूर / वार्ताहर
ढवळी ता. तासगावचे युवा उपसरपंच खासदार संजयकाका पाटील यांचेखास खंदे समर्थक अतुल पाटील वय ३७ वर्षे यांचे शनिवारी दि १६ रोजी दुपारी तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. उपसरपंच आतुल पाटील यांच्या अचानक मृत्यू च्या बातमीने ढवळी गावासह संपूर्ण तासगाव तालुक्यातमेडिकल असोसिएशन मध्ये शोककळा पसरली .
अतुल पाटील हे सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनमार्फत आयोजीत क्रिकेट स्पर्धा साठी सकाळी तासगाव मधून सहकाऱ्यांना घेऊन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आटपाडी येथे गेले होते.दुपारीतीन वाजता खेळत असताना त्यांना छातीत अचानक तीव्र वेदना जाणवल्या काही कळण्याच्या आगोदर ते मैदानावर कोसळले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी हलवण्याच्या आगोदरच त्यांचा मृत्यू झाला. ते सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे संचालक होते.
अतुल पाटील यांचे तासगाव व ढवळी येथे मेडिकल स्टोर आहेत. ते गेली अनेक वर्षांपासून खासदार संजयकाका पाटील यांच्या मोजक्या विश्वासु सहकार्यतील एक कट्टर व जवळचे युवा सहकारी होते. ते जय भवानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष होते. वसंतराव पाटील विद्यालय मांजर्डे चे माजी प्राचार्य व्ही एन पाटील सर यांचे ते चिरंजीव होत.
अतुल पाटील सलग पाच वर्षे ढवळी गावचे उपसरपंच होते व काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतही गावातील विरोधकांनाही जवळ करत एकत्र निवडणूक लावली होती. ते स्वतः उमेदवार होते. अतुल पाटील यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ढवळी गावावर शोककळा पसरली. अतुल पाटील यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या ढवळी या गावी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी एक सहा वर्षांची मुलगी एक तीन वर्षाचा मुलगाअसा मोठा परिवार आहे .