प्रतिनिधी /बेळगाव
भारतातील सर्वात आघाडीचा रिटेल ज्वेलरी ब्रँड तनिष्कने सणासुदीसाठी एक खास कलेक्शन दाखल केले आहे. ‘उत्साह’-जीवनाचा सण! समृद्ध परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाप, शुद्ध सोन्याचा उपयोग, अभिरुची संपन्न आणि कलात्मक समकालीन दागिने ही तनिष्कच्या नव्या कलेक्शनची वैशिष्टय़े आहेत.
प्लेन आणि ऑर्नेट सोन्यामध्ये अतिशय नजाकतीने घडविण्यात आलेली नाजूक नक्षीदार डिझाईन्स हे कलेक्शन समृद्ध भारतीय परंपरेला अनोख्या आधुनिक दागिन्यांच्या रुपात पुनःकल्पित करत एथनो-कन्टेम्पररी दर्शविते.
उत्साह कलेक्शनमध्ये नावीन्यपूर्ण स्टायलिंगसह पुन्हा नव्या संकल्पनांसह सादर करण्यात ओले सिल्हट्स आणि भौमितिक स्वरुपांमध्ये पारंपरिक रुपांकनांना आधुनिक करण्यावर भर देण्याबरोबरीनेच अतिशय अचूक कन्टेम्पररी ट्रीटमेंट्स प्रस्तुत केल्या गेल्या आहेत. हे प्रभावी आणि आधुनिक कलेक्शन मॉडर्न फिलिग्री, स्टॅम्प आणि वायर वर्क, इनमेल, जाळी ओव्हर स्टोन, टिकली, रावा आणि बॉल वर्कसारख्या कारागिरी तंत्रांच्या वापराला प्रोत्साहन देते. सोन्याची चमक आणि वेगवेगळय़ा पॅटर्न्स यांना एकत्र आणणारे हे कलेक्शन खरोखरच अनोखे आहे.
यावर्षीच्या सणासुदीच्या काळातील ज्वेलरी ट्रेंड्सना आधीच जोखून आणि त्यांना डोळय़ांसमोर ठेवून तनिष्कने शानदार लूकसाठी आकर्षक नेकलेसेसच्या लेयरिंगच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित केले. हे या कलेक्शनच्या सर्वात प्रमुख वैशिष्टय़ांपैकी एक आहे. तनिष्कचे ‘उत्साह’ कलेक्शन नजाकत, वारसा आणि आधुनिक संवेदनशीलतांसह समकालीन केल्या गेलेल्या पारंपरिक डिझाईन्सचा परिपूर्ण मिलाप आहे. जो पारंपरिक कारागिरीला नवे जीवन प्रदान करतो. हे अशा प्रकारचे अतिशय अनोखे मॉडर्न-हेरिटेज ज्वेलरी कलेक्शन आहे. जे भारतीय वारसा कलांच्या पॅटर्न्सनी प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे. यंदा दिवाळीत कोणत्याही महिलेची लूक परिपूर्ण बनविण्यासाठी शानदार अँसिलरी म्हणून हे कलेक्शन परफेक्ट ठरेल.