बेळगाव : भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड, तनिष्क या टाटा समूहातील ब्रँडने लाईट वेट दागिन्यांसाठी एक अनोखा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. ज्याचे नाव आहे ‘तनिष्क हायलाईट्स’. हलक्मया वजनाच्या सोन्याच्या दागिने वापरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे, ही वाढती मागणी पूर्ण करण्याच्यादृष्टीने आणि जेम्स व ज्वेलरी उद्योगक्षेत्रात आपले आघाडीचे स्थान अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने दागिने उद्योगातील दिग्गज ब्रँड तनिष्कने लाईटवेट ज्वेलरी लॉन्चचे हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
हलक्मया वजनाचे दागिने वापरण्याची आवड ग्राहकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली असून ती सातत्याने वाढत आहे. यामुळे उत्पादन अभियांत्रिकीवर पुन्हा एकदा भर दिला जाऊ लागला आहे. दागिन्यांना वापरादरम्यान स्थिरता व मजबुती देणाऱया व ग्राहकांना दागिन्यांच्या किमतीचे पुरेपूर मूल्य देणाऱया सामग्री नवकल्पनांचा एक भाग म्हणून 22 कॅरेट दागिने प्रस्तुत करताना अधिक जास्त काठिण्य व मजबुती असलेल्या गोल्ड अलॉयची सुरुवात, तांत्रिक नवकल्पना आणि निर्मिती प्रक्रियांची पुनर्रचना यांच्यामार्फत रचना पुनर्बांधणीसारख्या उत्पादन अभियांत्रिकीतील उपक्रमांमध्ये तनिष्कने अनेक प्रयोग केले आहेत.
वजनाला हलक्मया दागिने विभागात तनिष्कने अनोखे मूल्यवर्धित प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये दररोज वापरता येतील, असे लग्नासाठीचे खास आणि विशेष प्रसंगी वापरता येतील असे वेगवेगळे दागिने आहेत. या सर्व दागिन्यांमध्ये त्यांच्या वजनात आणि किमतीमध्ये देखील 15 ते 25 टक्के प्रमाणात घट झाली आहे. पण दागिन्यांचे स्केल, सर्वोच्च गुणवत्ता मानके, बहुआयामी स्थिरता, रचना सौंदर्य आणि सर्वोत्तम कारागरी यामध्ये मात्र तिळमात्र देखील फरक झालेला नाही. यामुळे आता ग्राहकांना ‘कमीसाठी जास्त खरेदी’ करता येईल.
‘हाय लाईट्स’ प्लॅटफॉर्मचा एक भाग म्हणून तनिष्कने 3500 पेक्षा जास्त एसकेयू सादर केले आहेत. यामुळे आता तनिष्कच्या ग्राहकांना अधिक जास्त बचत करता येईल. अधिक जास्त खरेदी करता येईल आणि सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतीबद्दलच्या अनिश्चिततेपासून स्वतःला वाचवता देखील येईल.
‘तनिष्क हाय-लाईट्स’ जवळपास सर्व उत्पादन विभागांमध्ये उपलब्ध असणार आहेत. एअररिंग्ज, अंगठय़ा, गळय़ातले दागिने, गळय़ातल्या दागिन्यांचे सेट्स, पेन्डन्ट्स, बांगडय़ा अशा विविध प्रकारात ‘तनिष्क हाय-लाईट्स’चा समावेश करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत आपल्या सर्वच्या सर्व 380 पेक्षा जास्त रिटेल स्टोर्सच्या मेगा नेटवर्कमध्ये 50 टक्के गोल्ड इन्व्हेन्टरी तनिष्क हाय-लाईट्समध्ये परिवर्तित करण्याचे उद्दिष्ट ब्रँडने ठरवले आहे.